वाळूजमहानगर, ता.22 – राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटलमॅन ऑटो कंपनी व्यवस्थापनाच्या पुढाकाराने वाळूज वाहतूक शाखा, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय व इतर विभागांना सोबत परिसरातून दुचाकी रॅली काढून कामगारांना मार्गदर्शन व मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता.22) जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
मेटलमॅन ऑटो लिमिटेड बी-12 या कंपनीच्या गेटपासून रॅलीला सकाळी 11 वाजता येथून सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक प्रमोद सुरशे, वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मेटलमॅन ऑटो लिमिटेडचे संचालक आणि सी ओ ओ श्रीकांत मुंदडा, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक धीरज खिरोडकर, मेटलमन ऑटो लि.चे एचआर आणि आयआर हेड तसेच बावा सेफ्टी क्लस्टरचे चेअरमन विजय साळवे, प्लांट हेड अनिलकुमार डहाळे, वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके, मार्ग चे सेक्रेटरी अमित दगडे, अतुल्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास चाटसे आदींची उपस्थिती राहणार आहे. मेटल मॅन ऑटो कंपनीपासून निघणारी ही दुचाकी रॅली वाळूज औद्योगिक वसाहतीतील मिडास केअर, जॉन्सन अँड जॉन्सन, एक्सलंट एन्व्हायरो अँड रिसर्च सेंटर, वैष्णोदेवी मंदिर, मोरे चौक मार्गे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे, महाराणा प्रताप चौक, आंबेडकर चौक, एफडीसी कॉर्नर मार्गे रस्ता सुरक्षा व अपघाताबाबत जनजागृती करत काढण्यात येणार आहे. या रॅलीचा समारोप मेटलमॅन ऑटो बी 12 येथे होणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कामगारांना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे.