
वाळूजमहानगर (ता.08) – छत्रपती संभाजीनगर येथे मेटल मॅन ऑटो कंपनीला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा – दिवाळीचे स्नेहसंमेलन रविवारी (ता.5) नोव्हेंबर 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

या उत्साहाचे उदघाटन कंपनीचे संचालक निशांत जयरथ, सी. ओ. ओ. श्रीकांत मुंदडा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थितीत अनिल कुमार डहाळे, आशिष शर्मा, कृष्णकांत बिजमवार, प्रकाश एखंडे, सूर्यकांत शानबाग, अथिया युसूफ, विजय साळवे, प्रवीण जोशी हे होते. या उत्सवामध्ये कामगार व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नपदार्थाचे, खेळण्याचे व विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. तसेच रास दांडियाचे सुद्धा आयोजन केले होते.
कंपनीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संचालक निशांत जयरथ यांनी पंचवीस वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना सहपरिवार एन्जॉय करण्यासाठी पंच तारांकित हॉटेलचे गिफ्ट व्हाउचर दिले. व विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी सर्व कामगार व कर्मचारी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निकम, वैशाली घाग, मकरंद निखाडे यांनी केले. तर आभार अतुल भास्कर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम राठोड, संचिन घोडके, किशोर जगताप, गुरुदास पराते, श्रावण ढोले, राजेश मानकर, दत्तात्रय धनक, विजय वाघमारे, संतोष जाधव, सुशील देवळे, विनोद वानखेडे, बाळासाहेब तांबे, काकासाहेब केरे, दिनेश लाडे, इमरान मिर्झा,बाळासाहेब नाटकर, योगेश भुतेकर, महेंद्र तेली इत्यादीने सहकार्य केले.
