
वाळूज महानगर, (ता.27) – मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड बी 31 एमआयडीसी वाळूज छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली.मंडळाच्या वतीने यावर्षी सर्व जगाचे लक्ष वेधून घेणारे व भारताची मान जगामध्ये उंचावणारे चंद्रयान तीन अभियान हा देखावा केलेला आहे. तो पाहण्यास नागरिकांसह कामगारांची मोठी गर्दी होत आहे. 
मेटल मॅन ऑटो या कंपनीमधीलच कामगार श्रावण ढोले यांनी स्क्रॅप मटेरियल मधून प्लास्टिक आणि थर्माकोल न वापरता
हा देखावा बनविला आहे. हा देखावा बघण्यासाठी विविध कंपन्यातील कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने येत आहेत. मेटलमॅन ऑटो कंपनीचे सीओओ श्रीकांत मुंदडा, प्लांट हेड अशीश शर्मा, एच आर हेड शांताराम साळवे यांनी कंपनीतर्फे मोलाचे सहकार्य केले. तसेच गुरुदास पराते, अशोक होळकर, हनुमंत नवहाते, राजेश मानकर, अनिल जाधव, बाळासाहेब वाळुंज, राजेंद्र बडगुजर, सचिन घोडके, अवधूत शिंदे, शानबाग, विष्णू जोशी, दीपक भोसले, सुनील महामुनी, आर एस मानकर, संतोष ढवळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
