February 5, 2026


वाळूजमहानगर, ता.14 – वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो लिमिटेड कंपनीत कामगारांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ता.13 जानेवारी 24 जानेवारी दरम्यान कंपनीच्या सर्व प्लांटमध्ये होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन मेटलमेन ऑटो कंपनीचे मेटलमॅन संचालक, सीईओ श्रीकांत मुंदडा व राज्य कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. पृथ्वीराज राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

मेटलमेन ऑटो लिमिटेड कंपनीचे संचालक नवनीत जयरथ यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच विमा धारकांच्या 100 व्या दिवसीय जागरूकता अभियानांतर्गत डॉ. पृथ्वीराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. कंपनीचे प्लांट हेड अनिलकुमार डहाळे, प्रकाश एखंडे, आशिष शर्मा, कृष्णकुमार बीजमवार, एच आर हेड शांताराम साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सागर वानखेडे, डॉ. यशश्री पाटील, डॉ. ज्योती जोहरे, डॉ. किरण बोरुडे, डॉ. व्ही जे देशमुख, डॉ. फारुख शेख, डॉ. पी डी चव्हाण,डॉ. डी ए तिपाले, डॉ. रोहित मैंद, डॉ. प्रल्हाद कोयते यांचे पथक कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना लागणारी औषधी मोफत देत आहे.

कंपनीच्या तिन्हीही प्लांट मध्ये 13 जानेवारी ते 24 जानेवारी या सुमारे दोन आठवड्याच्या कालावधी   कळविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी मेटलमॅन ऑटो कंपनीच्या प्लांट बी-12 प्लांटमध्ये 125 तर दुसऱ्या दिवशी प्लांट बी 17 मध्ये 118 कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख सचिन पवार, दिनेश नाडे, महादेव गायकवाड, श्रीधर लोंढे, जीवन फरकडे, अशोक गुहे, सुशील देवळे, योगेश चापे, प्रतिभा पाटील, गजानन वतनदार, विनोद वानखेडे, कल्याण पिनप्रतिवार, संजय राऊत, एस व्ही जगताप तसेच भारतीय कामगार सेनेचे सुधाकर तांबे, महेंद्र तेली आधी परिश्रम घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *