March 25, 2026

वाळूज महानगर, (ता.2) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो लिमिटेड या कंपनी कर्मचाऱ्यांच्या दहावी, बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मेटलमॅन ऑटो कंपनीच्या वतीने नुकताच करण्यात आला.

यावेळी मेटलमन ऑटो लिमिटेडचे संचालक आणि सीओओ श्रीकांत मुंदडा म्हणाले की, कंपनीतील कामगार यांच्या गुणवंत 10 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांशी बोलताना, मला जीवन आणि करिअर या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. ही पिढी संधी आणि आव्हानांनी भरलेल्या जगात पाऊल टाकत आहे. आणि मार्गदर्शक म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे ही आपली जबाबदारी आहे. गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी संघर्षांवर मात करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वास्तविक जीवनातील कथांद्वारे, मी त्यांना मोठे स्वप्न पाहण्याची, दृढ राहण्याची आणि स्वतःचे मार्ग स्वतः कोरण्याची प्रेरणा देतो. असे उपदेशपर मार्गदर्शन केले.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शैक्षणिक निकाल मिळवणाऱ्या 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि रोख बक्षीस देखील देण्यात आले.

कार्यक्रमालाप्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे एच आर हेड विजय साळवे, प्लांट हेड अनिल कुमार डहाळे, आशिष शर्मा, के पी बिजमवार, आशिष चोरडिया, विनोद वानखेडे, सचिन घोडके, प्रतीक्षा पाटील, योगेश चापे, सुशील देवळे, व्ही व्ही देशपांडे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *