वाळूज महानगर :- वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे दि बुद्धिस्ट युथ ग्रुप आणि लुबिनी बुद्धिविहार समिती व महिला मंडळाच्या वतीने 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत गरुडझेप करिअर अकँडमीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
गरुड झेप करियर आकँडमीचे संचालक निलेश सोनवणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र चित्रपट मंडळाचे जिल्हा सचिव कृष्णा सोनवणे, तालुका अध्यक्ष दिनेश धडे, जोगेश्वरीचे माजी सरपंच प्रवीण दुबिले, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक साहेबराव इंगोले आणि महिला प्रतिनिधी वंदना जाधव यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी गरुडझेपच्या 100 विद्यार्थ्यांना भाग घेतला होता. या स्पर्धेत
प्रथम पारितोषिक : ज्ञानेश्वर पेंडारे, द्वितीय : मनोज पाटील,
तृतीय : अथर्व बाणे या गरुडझेप अकॅडमीच्या स्पर्धकांनी बाजी मारली. तर महिला गटात प्रथम : प्रज्ञा रायगोंळे, द्वितीय : सुवर्णा तायडे, तृतीय : श्रुती वाहूळ यांनी पटकावले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ थोरात, प्रवीण थोरात, मिलिंद पनाड, लखन भारसाकळे, मनोज कुशर, विजय गायकवाड, राहुल थोरात, अजय दांडगे, विकास नवगिरे, अमोल त्रिभुवन, नितीन हिवराळे, भानुदास हिवराळे, कौतिक दांडगे, हरी अमराव, रमेश दाभाडे यांनी परिश्रम घेतले.