वाळूज महानगर, (ता.8) – मुल्यसंस्कार ही काळाची गरज असून शाळा आणि मुल्यसंस्कार ही एका गाडीचे दोन चाक आहेत. तसेच या धकाधकीच्या जीवनात अनेक अडचणी येतात तसेच मुलांच्या शिक्षणाचे व संस्काराचे प्रश्न निर्माण झाले असून त्या प्रश्नाचे निदान व उपाय श्री स्वामी केंद्रात होतात. यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा बालसंस्कार वर्गात जाणारा असावा. असे प्रतिपादन उद्योजक हनुमान भोंडवे यांनी केले.
बजाजनगर येथे मुल्यसंस्कार मेळावा व मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा 26 ते 27 नोव्हेंबर रोजी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख व श्री गुरूपीठ- त्र्यंबकेश्वर येथील पिठाधीश गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या सान्निध्यात होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्व तयारीसाठी बजाजनगर येथे रविवारी (ता.8) रोजी भव्य शिक्षक मांदियाळीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम दिप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी उद्योजक हनुमान भोंडवे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच श्री गुरूपीठ प्रतिनिधींनी गर्भसंस्कार, बालकाचा सर्वांगीण विकास, पंच ज्ञानेंद्रिय विकास, स्तोत्र – मंत्र यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन, पुर्वाश्रमीचे चालत आलेले सण-वार-उत्सव त्यांच्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन, मुल्यसंस्कार मेळाव्यामध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम, प्रदर्शन दालन, ज्ञानदान कक्ष, विविध प्रात्यक्षिक, शेतीशास्त्र याची माहिती दिली. याप्रसंगी बजाजनगर व परिसरातील अनेक शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.