February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – वाळुज परिसरात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र दानादैन झाली. त्याची झळ श्री स्वामी समर्थ मंडळाच्या मूल्यसंस्कार सोहळ्यास बसली. परिणामी कार्यक्रमस्थळात बदल करण्यात आला असून करोडी येथील टोल नाक्याजवळ सोमवारी (ता.27) रोजी दुपारी 4 वाजता तो होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील सिडको वाळूज महानगरात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या पावन सानिध्यामध्ये सोमवारी (ता.27) नोव्हेंबर 2023 रोजी होणारा मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा सिडको महानगर 1 पाण्याच्या टाकीजवळ न होता या ऐवजी कार्यक्रमाचे बदललेले नवीन ठिकाण करोडी टोलनाक्याजवळ, ओम साई फॅमिली रेस्टॉरंटच्या मागील गोडाऊन, धुळे – सोलापूर हायवे, छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी होणार असून सर्व भाविक व सेवेकऱ्यांनी दुपारी 3 वाजता बदललेल्या नवीन कार्यक्रम ठिकाणी उपस्थित रहावे व संपर्कातील सर्व भाविक सेवेकऱ्यांना कळवावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *