March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.28) – मुली च्या प्रेम विवाहाला मदत केल्याचा राग मनात धरून, पित्याने पाच जणांशी संगणमत करून दुचाकीवरून जाणाऱ्या पितापुत्राला महिंद्रा बोलेरो जीपने पाठीमागून जोराची धडक देऊन चाकाखाली चिरडून एकाला जागीच ठा केले. तर त्याच्या वडिलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. एखाद्या चित्रपटाला साजेशी ही अत्यंत सनसनाटी घटना वाळूज परिसरात गुरुवारी (ता.28) रोजी दुपारी घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओझर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शिवराम एकनाथ मोरे (वय 43) हे शेती करून ऊसतोड मुकादम म्हणून काम करतात. शिवराम मोरे यांच्या भाचा विशाल नवले रा. चितेगाव याचे धूपखेडा तालुका पैठण येथील सचिन भागचंद वाकचौरे यांच्या मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यातून त्यांनी प्रेमविवाह केला. त्याचा राग वाकचौरे यांच्या मनात होता. गुरुवारी (ता.28) रोजी दुपारी शिवराम एकनाथ मोरे व त्यांचा मुलगा पवन शिवराम मोरे (वय 26) याच्यासह

पल्सर दुचाकी(एम एच 20, जी यु -4944) वरून स्वतः च्या गावी ओझर येथे जात होते. शिवराम मोरे यांच्या भाच्याने मुलीशी प्रेम विवाह केल्याचा मनात असलेल्या रागावरून आरोपी सचिन भागचंद वाकचौरे याने इतर पाच जणांशी संगणमत करून महिंद्रा बोलेरो जीप (एम एच 20, ई वाय -0645) गाडीने दुचाकीवर जाणाऱ्या मोरे पिता पुत्रांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे शिवराम व त्याचा मुलगा उंच उडून रोडवर पडले. आरोपींनी पुढे जाऊन महिंद्रा बोलेरो जीप गाडी वळवून आणली व पुन्हा शिंदे यांच्या अंगावर घालून चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला केला. तसेच रोडवर पडलेल्या शिवराम मोरे यांच्या मुलाच्या डोक्यावरून चाक नेऊन त्यास गाडीखाली चिरडून जागीच ठार केले. ही घटना गुरुवारी (ता.28) रोजी दुपारी 12.30 ते 12.45 वाजेदरम्यान शेंदूरवादा ते सावखेडा रोडवरील राष्ट्रमाता शाळेजवळ घडली. याप्रकरणी शिवराम एकनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन भागचंद वाकचौरे रा. धुपखेडा तालुका पैठण जि. छत्रपती संभाजीनगर व ईतर 5 जणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात कलम 302, 307, 34 भादंवि. प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांनी हा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र विठ्ठलराव सहाणे स्वतः करीत आहे.

अपघाताचा केला बनाव –
दुचाकीवर जाणाऱ्या मोरे पितापुत्राला जीवे ठार मारण्यासाठी आरोपींनी अपघाताचा बनाव केला. दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. ते दोघेही खाली पडल्यानंतर आरोपींनी पुन्हा बोलेरो जीप पाठीमागे घेऊन त्यांच्या अंगावर घालून चाकाखाली चिरडले. आणि बोलेरो जीप घटनास्थळीच सोडून पोलीस येण्यापूर्वीच आरोपी फरार झाले.


दक्ष नागरिकांनी दिली खबर
प्रथम दर्शनी अपघात वाटणाऱ्या या घटनेची माहिती शेंदूरवादा येथील दक्ष नागरिक आनंदा आप्पा निकम यांनी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांना दिली असता पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली.

पोलिसांची घटनास्थळी धाव –
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळुज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, कारभारी देवरे, सुखदेव भागडे, गणेश लक्कस, महेश पाटील, संदीप धनेधर, विजय पिंपळे, सुधाकर पाटील आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जबाब घेताच खरा प्रकार उघड –
शेंदूरवादा ते सावखेडा रोडवर अपघात होऊन एक ठार तर एक जण जखमी झाला. जखमीला उपचारार्थ सावखेडा येथील डॉक्टर शिरसागर यांच्या कृष्णाई हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले गणेश लक्कस व संदीप धनेधर आदींनी दवाखान्यात धाव घेतली. तेथे पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांनी जखमी शिवराम मोरे यांचा जबाब घेतला असता खरा (अंगावर जीप घालून एकाचा खून करणे व दुसऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे) प्रकार उघडकीस आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *