
वाळूज महानगर, (ता. 12) – वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या एका महिन्याच्या गळ्यातील सोन्याचा हार (गंठण) व रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र असे दागिने हिसकावून दुचाकीवरून पळ काढणाऱ्या एका चोरट्यास वाळूज पोलिसांनी जेरबंद करून त्याच्या ताब्यातून अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वटपुजेसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील 3 तोळे वजन असलेला सोन्याचा हार दुचाकीवर आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावुन नेला होता. घटनेनंतर संभाजीनगर शहरातुन निघुन जातांना त्याच आरोपींनी सांयकाळी 5.30 वाजेच्या वाळुज पोलिसांच्या हद्दीतील शिवराई शिवारात शेतात जाणा-या शेतमजुर महिलेस ती एकटी असल्याचे बघुन गळ्यातील पोत हिसकावुन नेली. या
प्रकरणी वाळुज व जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्याचे तपास करताना वाळुज पोलीसांनी टोलनाक्यावरील फुटेज तपासले असता दोन युवक स्पोर्ट बाईकवर हेल्मेट घालुन भरधाव वेगाने अहिल्यानगरकडे निधुन गेल्याचे आढळुन आले. त्यांचा हॉटेल, ढाबे असा सीसीटीव्हीच्या अधारे नेवासा पर्यन्त ट्रेस केला. तसेच पोलीस अंमलदार विजय पिंपळे यांना गुप्त बातमी मिळाली की, हे गुन्हे हे गणेश चव्हाण याने केले असुन तो गुन्हयातील चोरलेले सोन्याचे दागिणे हे वाळुज भागात विकण्यासाठी येणार आहे. या बातमीच्या अनुशंगाने वाळूज पोलीसांनी सापळा रचुन माहितीचे आधारे गणेश विजय चव्हाण (वय 25 वर्ष) रा.अशोकनगर, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यास 1 जून रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडुन गुन्ह्यातील 3 तोळे वजनाचा व 1 लाख व 20 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार (गंठण) तसेच 14 हजार रुपये किमतीचे मनी मंगळसुत्र असा एकुण 1 लाख 34 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हे जशाचे तसे हस्तगत करण्यात आले. आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोालीस उपनिरीक्षक अजय शितोळे हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस हवालदार संदिप धनेधर, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, नितीन धुळे, सुधाकर पाटील, पोलीस मित्र अमन शेख यांनी केली.
