वाळुज महानगर – जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी ग्रामपंचायत वळदगांव येथे शुक्रवारी (ता.14) रोजी भेट देऊन विकास कामाची पहाणी केली. यावेळी वळदगाव ग्रामपंचायतच्या वतीने मीना यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव येथे शुक्रवारी (ता.14) रोजी भेट दिली व गावाची पाहणी करून माहिती घेतली. याप्रसंगी औरंगाबाद पंचायत समीतीच्या गट विकास अधिकारी उषा मोरे, विस्तार अधिकारी देविदास मगर, मुख्य कार्यकारी अभियंता खंदारे, बालोद यांची उपस्थिती होती. यावेळी वळदगाव ग्रामपंचायतच्या वतीने
मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच अमर कचरुसिंग डांगर, उपसरपंच संजय त्रिंबकराव झळके, माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य गणेश कडूबा नवले, ग्रामपंचायत सदस्य विष्णू रंगनाथ झळके, अशोक रमेश खोतकर, सीमा रितेश पहाडिये, वैशाली विनोद खोतकर, गंगा अविनाश घुले, वर्षा महेश घोडके, प्रीती मनेश शिंदे, नंदा सुभाष साबळे, ग्रामविकास अधिकारी बळीराम धर्मु राठोड तसेच विनोद खोतकर, रितेश पहाडीये, राजेंद्र मुसळे, नितेश चुंगडे, शेख चांद पाशा, शेख शफीचांद, राधा मरमट व गावकरी उपस्थित होते.