वाळुज महानगर, (ता.3) – गिफ्ट खरेदीसाठी गेलेल्या 48 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावून पळ काढला. शनिवारी (ता.1) रोजी भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यशवंती हौसिंग सोसायटी आर. एक्स 4/11, जागृत हनुमान मंदीरजवळ, बजाजनगर
येथील सुमित्रा दशरथ लांडगे वय 48, व मंदाकिणी मधुकर लाड, पुष्पलता शामसुंदर शहाणे, मंगल सदाशिव कासीद. या महिला गिफ्ट आणण्यासाठी पंढरपूर येथे गेल्या होत्या. साडी खरेदी केल्यानंतर रिक्षामधून येत असताना पंढरपूर येथील ओयसिस चौकात एका दुचाकीस्वाराने सुमित्रा लांडगे यांच्या गळ्यातील मिनी गंठण हिस्कावले. मात्र प्रसंगावधान राखत लांडगे यांनी त्यास विरोध करत मिनी गंठण घट्ट पकडले. ते हिसकावल्याने ते तुटून अर्धा भाग चोरट्याच्या तर अर्धा भाग लांडगे यांच्या हातात आला. पकडले जाऊ नये म्हणून चोरट्याने तेथून दुचाकीसह पळ काढला. याप्रकारे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——–