वाळूजमहानगर, (ता.9) – श्री माहेश्वरी मंडळ वाळूज प्रभागच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तापडिया डायग्नोस्टिक सेंटर मार्फत भव्य रक्त व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारी (ता.8) रोजी करण्यात आले. यामध्ये माहेश्वरी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बजाजनगर येथे महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या शिबिरात वयोवृद्ध महिलांची मोफत तर इतर महिलांसाठी अगदी अल्प दरात आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर समाजातील काही महिलांची सत्कार करण्यात आला. यात कुसुम सोनी, विजया काबरा, निता लाठी, वैशाली तोतला यांना क्राऊन पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी वाळूज प्रभाग प्रमुख मनीष मुंदडा, श्रीनिवास सोनी, रचना मालपाणी, योगेश मिनियार यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना स्वस्त मस्त आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. अमित तोतला आणि डॉ.कल्पेश गग्गड यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा भन्साळीयांनी केले तर किरण राठी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रभाग कमिटी तसेच नियोजक उज्वला भक्कड, दीपा राठी, रश्मी सोनी, संगीता सोनी, दिपाली भक्कड यांनी परिश्रम घेतले.
