February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.8) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील शहीद भगतसिंग शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मुख्याध्यापिका भारती साळुंखे यांच्या संकल्पनेतून व स्काऊट मास्टर आप्पासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माझी भाकरी माझी जबाबदारी हा उपक्रम राबवला शाळेतील शहीद भगतसिंह स्काऊट पथक व इतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून विद्यार्थ्यांनी चुलीची मांडणी केली व सरपण लाकडी इंधन गोळा करून माझी भाकरी उपक्रमास सुरुवात केली.
विद्यार्थ्यांचा उत्साह बघून शिक्षकांनाही मोहावरला नाही शिक्षकही स्वखुशीने या उपक्रमात सहभागी झाले व विद्यार्थ्यांसोबत त्यांनीही भाकरी बनवण्याचा आनंद घेतला.

स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना कॅम्पिंग साठी नेहमी बाहेर निसर्गाच्या सानिध्यात जावे लागते. अशावेळी विद्यार्थ्यांना जेवणाची अडचण होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यास स्वयंपाक करता आला पाहिजे. हा हेतू ठेवून हा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंखे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेऊन अतिशय सुंदर चविष्ट अशा भाकरी बनवल्या.

यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्या मागचा हेतू की, जेणेकरून आई-वडिलांशिवाय राहण्याची वेळ आली किंवा आई-वडील कुठे गावी गेले. अशावेळी किमान प्रत्येकाला स्वतः पुरता स्वयंपाक बनवता आला पाहिजे. जेणेकरून उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

स्काऊटिंग मध्ये कॅम्पिंग हा खूप महत्त्वाचा उद्देश असतो आणि या कॅम्पिंग साठी विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी स्वतः कराव्या लागतात. अशावेळी स्वयंपाक हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यात विद्यार्थी मागे राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना कॅम्पिंग जाण्या अगोदरच स्वयंपाक बनवणे शिकवायचे आहे. जेणेकरून माझा प्रत्येक स्काऊट हा स्वतःचा स्वयंपाक स्वतः करू शकतो नव्हे तर स्वतः सोबत इतरांनाही तो जेऊ घालू शकतो. असे स्काऊट मास्टर आप्पासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्काऊट मास्टर आप्पासाहेब मिसाळ, अक्षय हरकळ, करण लगाने, बाळासाहेब खोपडे, स्वप्निल शेळके, बाबासाहेब कुमखाले, उत्कर्ष आहेर, वाहेद पठाण, अनिता दहिजे, संगीता मुंडकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनीही परिश्रम घेतले.

————— —-

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *