February 23, 2025

 

वाळूजमहानगर – अंदाजे एका 55 वर्षीय महिलेला शेतात एकटी गाठून तिला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या अंगावरील दागदागिने व पिशवीतील रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने हिसकावून आरोपी फरार झाला. ही सणसणाची घटना वाळुज परिसरातील चिकठाण शिवारात सोमवारी (ता.3) रोजी सायंकाळी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिकठाण येथील अंदाजे 55 वर्षीय महीला सोमवारी (ता.3) रोजी अंबाड्याची भाजी आणण्यासाठी शेतात गेली होती. की शेतात एकटीच असल्याचे पाहून एका आरोपीने तिला बेदम मारहाण करून तिच्या अंगावरील दाग दागिने व कमरेच्या पिशवीतील रोख रक्कम हिसकावली. व फरार झाला. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेली ही महिला गावात आल्यानंतर मोठा जमाव जमला. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेला पाचारण केल्याने पायलट राजू रोकडे यांनी या जखमी महिलेला प्रथम वाळूज पोलीस ठाण्यात व नंतर घाटीत दाखल केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपायुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे,उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण बुट्टे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून चौकशी केली.

अन् तिने दाखवली हिम्मत
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास महिला कपाशीच्या शेतात एकटीच होती. ही संधी साधून आरोपीने तिच्यावर अचानक हल्ला केला. मात्र तिने हिम्मत दाखवल्याने त्याच्याबरोबर चांगलीच झटापट झाली. त्यामुळे पकडले जाऊन म्हणून आरोपीने तेथून पळ काढला. मात्र या झटापटीत आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला.
तत्पूर्वी महिलेने त्याचा प्रतिकार केल्याने त्याचा मोबाईल घटनास्थळीच पडला.

पोलिसांची रात्रभर शोध मोहीम

या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना त्याच्या विरुद्ध पक्का पुरावा मिळाला. या पुराव्या आधारे वाळूज पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली.  सकाळ पर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र त्याच्या लवकरच मुस्क्या आवडल्या जातील असा ठाम विश्वास पोलिसांनी वर्तवलाआहे.

अहवालानंतर उलगडणार सत्य

पीडित महिला ही एकटीच असल्याने आणि शेतात उंच वाढलेली कपाशी असल्याने आरोपीने या महिला गाठून हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीने अंगावरील दागदागिने व रोख रक्कम हिसकावली. तसेच यावेळी त्याने काही गैरकृत्य केले असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या महिलेस वाळूज पोलिसांनी घाटीत दाखल केले असून डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतरच सत्य उलगडणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *