
वाळूजमहानगर, (ता.11) – वुमेन इंटरप्रीमियरशिप डेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून महिलांनी आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक व्हावे या उद्देशाने मसिआ संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच 18 वर्षावरील महिलांसाठी खुल्या मॅरथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता.11) रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. संगीता देशपांडे, अंजली अतुल सावे, तृप्ती प्रितिश चटर्जी तसेच पोलिस निरक्षक संदीप गुर्मे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मसिआ अध्यक्ष किरण जगताप, वुमेन इंटरप्रीमियरशिप डेव्हलपमेंट सेलच्या कनव्हेनर रत्नप्रभा शिंदे व मॅरथॉनच्या कनव्हेनर पल्लवी दलाल यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत 5 किमी आणि 3 किमी असे दोन गट करण्यात आले होते. त्यामध्ये 5 किमी अंतर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्रियंका ढोले, द्वितीय पारितोषिक सुनीता जापुलकर तर तृतीय पारितोषिक विठाबाई कच्छवे यांनी प्राप्त केले. तर 3 कीमी अंतर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रिद्धि गाडेकर, द्वितीय पारितोषिक कोमल लिंभारे तर, तृतीय पारितोषिक उमा गाडेकर यांनी प्राप्त केले. सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते मेडल देखील देण्यात आले. स्पर्धेमध्ये उद्योजिका, कंपनीमधील महिला कर्मचारी, महिला कामगार, विद्यार्थीनी, डॉक्टर, महिला पोलिस, शिक्षिका, गृहिणी आदीसह एकूण 560 महिलांनी सहभागी नोंदवला. यामध्ये 60 वर्षावरील महिलां देखील सहभागी होत्या. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजकत्व मे सवेरा ग्रुप आणि मे. संजीव ऑटो यांनी दिले होते. तर सह-प्रायोजकत्व मे चंद्रा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिकल्स, मे. किर्दक ऑटो कॉम, मे. टेकनोअँड मे. दिग्विजय इंडस्ट्रीज, मे. गोल्डन सिटी हॉस्पिटल, मे. राजमुद्रा ग्रुप, मे. देवगिरि सुपर मार्केट, मे. स्वादम मसाले, मे. श्री गजानन सर्विसेस, मे. प्राप्ती योग साधना, मे. वाबळे इंडस्ट्रीज, मे. देवगिरि बँक यांचे होते. मॅरथॉनसाठी मार्गदर्शक म्हणून उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव राहुल मोगले, कार्यकारिणी सदस्य राजेश मानधनी, सलिल पेंडसे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेदरम्यान स्वयंसेवक म्हणून 50 उद्योजक आणि त्यांच्या कर्मचारी तसेच पोलिसांनी सहकार्य केले. या स्पर्धेसाठी वुमेन इंटरप्रीमियरशिप डेव्हलपमेंट सेलच्या कनव्हेनर रत्नप्रभा शिंदे, मॅरथॉन कनव्हेनर पल्लवी दलाल, सुनीता राठी, सुलभा थोरात, मंगला महाजन, सारिका किर्दक, जया पवार, प्रियंका वाबळे, शामला काळे, वर्षा लोया, राजश्री कुलकर्णी, जमुना मानधनी, गुणल पिंपळे आदींनी परिश्रम घेतले. या वेळी माजी अध्यक्ष भारत मोतींगे, सुनील किर्दक, अध्यक्ष किरण जगताप, सचिव राहुल मोगले, कोषाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, उद्योग संवादचे संपादक श्रीराम शिंदे यांच्यासह, प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले, कार्यकारिणी सदस्य राजेश मानधनी, अर्जुन गायकवाड, अजय गांधी, शरद चोपडे, आनंद पाटील, नितीन तोष्णीवाल, दिलीप चौधरी, सर्जेराव साळुंके यांच्यासह जवळपास 30 उद्योजकांची उपस्थिती होती.
