
वाळूजमहानगर, (ता.24 – वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका 35 वर्षीय महिला कामगाराच्या घरात घुसून तिच्या ओळखीच्या सुपरवायझरने मनाला लाज वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. रविवारी (ता.21) रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्रकरणी सोमवारी (ता.22) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील 35 वर्षीय महिला जोगेश्वरी येथे कुटुंबासह राहते. ती वाळूज औद्योगिक वसाहतीतील
सवेरा आटो कंपनीत काम करते.रविवारी (ता.21) रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास पीडित स्वयंपाक करीत असताना
मार्केल पॉली इंडस्ट्रीज मध्ये सुपरवायझरचे काम करणारा आरोपी प्रविण भोसले (27) रा.बजाजनगर हा अचानक घरात आला आणि तिच्या लाज वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिने आरडा ओरड केल्याने बाहेर असलेले मुले व पती घरात आले. त्याला घराबाहेर काढून देत असताना त्याने महिलेला जोरात धक्का मारून खाली पाडले. त्यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी देत घरातून पळ काढला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी प्रविण भोसले विरुद्ध सोमवारी (ता.22) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
