वाळूजमहानगर, ता.10 (बातमीदार) – कंपनीत काम करीत असताना एका लेबर ठेकेदाराने त्याच्याकडेच काम करणाऱ्या 25 वर्षीय महिला कामगारास विनाकारण स्पर्श करणे, बोलणे, फोटो व्हिडिओ काढणे. असे प्रकार करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत, मानसिक छळ करून व तिला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तिने विषारी औषध सेवन करून शनिवारी (ता.7) रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी एका ठेकदारा विरूध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळुज औद्योगिक वसाहतीत अशा घटना घडत असल्याने महिला कामगारांनी आता सावध भूमिका घेण्याची अत्यंत गरज आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
निकिता अनिल वाघमारे वय 25, रा.सलामपुरेनगर वडगाव (कोल्हाटी) ही महिला वाळूज औद्योगिक वसाहतीतील रेमंड कंझुमर केअर या कंपनीत लेबर ठेकेदार,सुपरवायझर ईस्माईल पठाण रा. वडगाव रोड साजापूर याच्याकडे सुमारे वर्षभरापासुन कत्राटी पध्दतीने काम करत होती. ती काम करत असतांना ठेकदार ईस्माईल पठाण तीच्या जवळ जाऊन तीला वाईट उदेशाने स्पर्श करीत होता. हा प्रकार सहन न झाल्यामुळे निकिता हिने पती अनिल वाघमारे यास सांगितला. त्यांनतर अनिल याने सुपरवार्ईझर अमोल होर्शीळ याच्या सोबत जाऊन ठेकेदार पठाण यास सामजावून सांगितले. त्यानंतर पठाण याने दोन महिने त्रास दिला नाही. त्यांनतर मात्र निकिता कपंनीत काम करत असतांना तीचा फोटो व व्हिडोओ काढत मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कटाळलेल्या निकिताने त्याच्याकडील काम बंद करून दुसर्या ठेकेदारामार्फेत कपंनीत काम करू लागली. तरीही पठाण हा कोणत्या ना कोणत्या करणावरुन तीला त्रास देत होता. पठाणच्या त्रासापासुन सुटका व्हावी. म्हणून त्याच्या तर्फे ती कपंनी पुन्हा काम करू लागली. त्यांनतर सुध्दा विनाकारण तीची ड्युटी चेंज करणे, जवळीक साधणे, विनाकरण बोलणे, तसेच पगार कट करण्याची व घरच्यांकडे तक्रार करण्याची धमकी देणे. असा मानसिक त्रास देत होता. तीला हा त्रास सहन न झाल्याने तीने शनिवारी (ता.7) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यापर्वी तीने ईस्माईल पठाण याच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. या प्रकरणी निकिताचा पती अनिल वाघमारे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठेकेदार र्ईस्माईल पठाण यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
खूपच धक्कादायक प्रकार –
वाळुज औद्योगिक वसाहतीतील अनेक लेबर ठेकेदारांकडून तसेच सुपरवायझर यांच्याकडून महिला कामगारांचा अशाच प्रकारे छळ करण्यात येतो. हा छेडछाडीचा प्रकार असून अनेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला, मुली त्यांच्या या कृत्यास बळी पडतात. तर काही निडरपणे त्यांचा मुकाबलाही करतात. मात्र मुकाबला केला तर नोकरी जाईल या भीतीपोटी अनेक महिला कामगार त्यांचे हे कृत्य सहन करतात. प्रकारचा मानसिक अत्याचारा सहन करत असतात. या प्रकारामुळेच वाळूज औद्योगिक वसाहतीतील बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहे. परिणामी वाळूज औद्योगिक वसाहतीतील महिला कामगारांसाठी ही मोठी धक्कादायक व खळबळ जनक बाब आहे.
