
वाळूजमहानगर, (ता.22) – कोमल स्वप्न महिला सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन सिडको महानगर -1 येथे शिवजंयती साजरी करण्यात आली. कोमल स्वप्न सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रेखाताई कैलासराव सुर्यवंशी, अबोली चव्हाण, स्वाती वाठोरे, वैशाली जाधव, अश्विनी राठोड, अनिता लहाने, अन्नपुर्णा तानलकर याच्या हस्ते शिवपुजन करण्यात आले.
यावेळी अश्विनी कुलकर्णी, रेणुका लोहकरे, दिव्या आडे, गोरी कुचे, वैशाली जाधव, रिंकु शेजवळ, ममता सोनवणे, मनिषा बेडवाल, वैशाली गुळवे, मंदा गवळी, सिमा काळे, वैष्णवी आधाने, ज्योती नाईक, नेहा चव्हाण आदि महिलांची उपस्थिती होती.
