
वाळूजमहानगर, ता.4 (बातमीदार) – शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ऑरीक सिटीत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘महाअडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोला’ जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. 
प्रदर्शनाचे अतिशय काटेकोर नियोजन पाहणी करून त्यांनी आयोजकांचे कौतुक देखील केले . यावेळी पाण्डेय यांनी ऑरिक सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी, मसिहाचे अध्यक्ष किरण जगताप आदीसोबत प्रदर्शनातील इलेक्ट्रॉनिक ट्रांसफार्मर, सूर्या लाईट, मॅजिक इंडस्ट्रीज, प्री इंजीनियरिंग बिल्डिंग, काँक्रेट रोड कटिंग मशीन आदीसह विविध स्टॉलची पाहणी केली.
उद्या 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे या एस्पोचे उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनासाठी तयार करण्यात आलेले भव्य व्यासपीठ आणि आसन व्यवस्थेची तसेच कॉन्फरन्स हॉल, व्हीआयपी हॉलची पाहणी करून जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काही महत्त्वाच्या सूचना आयोजकांना केल्या.
