February 5, 2026


वाळूजमहानगर – भारतातील नामांकित दुचाकी निर्माण करणाऱ्या हिरो कंपनीच्या महालक्ष्मी हिरो शोरूमचा शुभारंभ शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत महालगाव ता. वैजापूर येथे शनिवारी (ता.3) रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आला.

फित कापून शोरूमचा शुभारंभ करताना मान्यवर

ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा व उच्च दर्जाची दुचाकी वाहने उपलब्ध व्हावी. म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश (बप्पा) दळवी व त्यांचे पुत्र उद्योजक मयुरेश दळवी यांनी महालगाव येथे गंगापूर वैजापूर रोडवर हिरो महालक्ष्मी शोरूम सुरू केले आहे. या शोरूमचा शुभारंभ शनिवारी (ता.3) आगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शोरूमच्या शुभारंभ प्रसंगी प्रथम ग्राहकाला दुचाकीची चावी देताना

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, उद्योजक शशिकांत ढमढेरे, संतोष ढमढेरे, श्रीकांत ढमढेरे, वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, उद्योजक कैलास भोकरे, ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब झिंजुर्डे, उपतालुका प्रमुख प्रकाश शेळके, मच्छिंद्र शेळके, साईनाथ आहेर, नवनाथ गायकवाड, रजनीकांत नजन, बंडू ताकते, दीपक भाऊ, अन्ड आशुतोष डख, भगवान ढेरंगे, काकाजी जीवरग, देविदास जाधव, डी के मोरे, पोलीस पाटील गोविंद पाटील, प्रकाश अल्हाट, चार्लस आल्हाट, तुकाराम आहेर, संपत जाधव, रावसाहेब आल्हाट, बापू साठे, आसाराम गंडे, सुधाकर आल्हाट, दीपक कुट्टे, सुनील काळे, राजू गलांडे, अमोल मलिक, काकासाहेब जाधव, गणेश शेळके यांच्यासह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महालक्ष्मी शोरूमचे संचालक मयुरेश दळवी यांनी तर उपजिल्हाप्रमुख तथा संचालक बप्पा दळवी यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *