February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.22) – बजाजनगर येथील महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सामाजिक व न्याय कैबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी मान्यवर व हितचिंतकांनी बंडगर आणि देवबोने परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे, अप्पर विभागीय आयुक्त मंजुषा मिसकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन,

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, वडगाव (को.) – बजाजनगरचे सरपंच सनिल काळे, उद्योजक कैलास भोकरे, श्री गजानन विद्या मंदिरचे अध्यक्ष आय जी जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, युवासेना कार्यकारी सदस्य हर्षदाताई शिरसाठ,

शिवसेना (उबाठा) तालुका समन्वयक बाळासाहेब कारले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिलभैय्या चोरडिया, माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धिवर, उद्योजक अर्जुन आदमाने, माजी उपसभापती तथा छत्रपती संभाजीनगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव चव्हाण, बजरंग पाटील, कैलास सोनवणे, बालाजी उंदरे, तीसगावचे माजी उपसरपंच विष्णू जाधव, भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सुनंदा जाधव, गंगाखेड शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश उंदरे, सय्यद वरखडे, सोलापुरचे प्रगतशील बागायतदार महादेव हांडे यांच्यासह

आसेगावचे डॉ गंगाधर देवबोने, वाळूज महानगर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल लहाने, डॉ. दिलीप ठोंबरे, डॉ. रामेश्वर हजारे, डॉ. ज्ञानेश्वर चेके, डॉ. महेंद्रसिंग परिहार, डॉ. राहुल फोलाने, डॉ. योगेश कणखर, डॉ. सपना कंकर, डॉ. तुषार बाविस्कर, डॉ. महेश कचोले,डॉ. ज्ञानेश्वर बनकर, डॉ. सुदाम गवळी, डॉ. प्रमोद भोसले, डॉ. ज्योती अल्नुरे, डॉ. प्रतीक्षा शेलारे, डॉ. सिद्धेश्वर शेलारे आदींची उपस्थिती होती.

यावेळी सर्वांनी महालक्ष्मी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर भगवान बंडगर, रंजना मनोहर बंडगर, मनोज मनोहर बंडगर, रवीना मनोज बंडगर, डॉ. किशोर गंगाधर देवबोने, डॉ.अक्षय मनोहर बंडगर, डॉ. प्रियंका अक्षय बंडगर यांना भरभरून शुभेच्छा देत बंडगर आणि देवबोने परिवाराचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंश बंडगर, अंशिका बंडगर, श्री समर्थ क्लिनिक अँड डे केअर, श्री महालक्ष्मी मेडिकल, अंशराजे प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरचे संचालक आदींनी परिश्रम घेतले.

 

सर्व सुविधांनी युक्त असलेले महालक्ष्मी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पी.ए.पी 35, कोलगेट चौक वृंदावन हॉटेलच्या बाजुला, एम.आय.डी.सी वाळुज, छ संभाजीनगर, बजाजनगर येथे शुक्रवारी 21 नोव्हेंबर पासून वाळुज महानगर वाळुज महानगरवाशी यांच्या सेवेत सुरू झाले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *