February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.20) – बजाजनगर येथे सर्व सुविधांनी युक्त असलेल्या पी.ए.पी 35, कोलगेट चौक वृंदावन हॉटेलच्या बाजुला, एम.आय.डी.सी वाळुज, छ संभाजीनगर येथील महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ उद्या शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

 

यावेळी उद्घाटक म्हणून सामाजिक व न्याय कैबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विरोधी पक्ष नेते (महाराष्ट्र राज्य) अंबादास दानवे हे असणार आहे. तर प्रमुख पाहुणे खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय केनेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, आमदार पंढरपूर मंगळवेढा जि. सोलापूर समाधान दादा आवताडे, पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, बजाज ऑटोचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर कैलास झांझरी, आर. आर पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील, युवासेना कार्यकारी सदस्य हर्षदाताई शिरसाठ, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिलभैय्या चोरडिया, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धिवर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हिरालाल सलामपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, उद्योजक अर्जुन आदमाने, शिवसेना तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, वडगाव (को.) – बजाजनगरचे सरपंच सनिल काळे, शेवाळे तालुका पाचोडचे सरपंच योगेश पाटील, माजी उपसभापती तथा छत्रपती संभाजीनगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव चव्हाण, माजी सभापती धनश्री कांबळे, बजाज ऑटोचे ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर प्रवीण गुंजाळ, बजाज ऑटोचे डॉ प्रबोध गुंजकर, तीसगावचे माजी उपसरपंच विष्णू जाधव, आसेगावचे डॉ गंगाधर देवबोने, भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सुनंदा जाधव, गंगाखेड शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश उंदरे, सय्यद वरखडे, सोलापुरचे प्रगतशील बागायतदार महादेव हांडे आणि वाळूज महानगर डॉक्टर्स असोशिएशनची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महालक्ष्मी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बजाजनगरचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर भगवान बंडगर, रंजना मनोहर बंडगर, मनोज मनोहर बंडगर, रवीना मनोज बंडगर, डॉ. किशोर गंगाधर देवबोने, डॉ.अक्षय मनोहर बंडगर, डॉ. प्रियंका अक्षय बंडगर यांच्यासह अंश बंडगर अंशिका बंडगर यांनी केले आहे. श्री समर्थ क्लिनिक अँड डे केअर, श्री महालक्ष्मी मेडिकल, अंशराजे प्रतिष्ठान छ. संभाजीनगरचे संचालक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *