February 24, 2025


वाळूजमहानगर (ता.24) – वाळुज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे सहायक महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले व परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यंकट मैलापुरे यांना मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र भूषण ही पदवी मिळाली आहे.

नांदेडमधील देगलूर तालुक्यातील कारेगावचे सुपुत्र ज्यांनी आपले पदवी शिक्षण 1994 मध्ये पूर्ण करून गेल्या 25 वर्षांपासून सध्या बजाजनगर, औरंगाबाद येथील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे सहायक महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असून व्यंकट मैलापुरे यांना मॅजीक ॲन्ड आर्ट युनिव्हर्सिटी दिल्लीकडून मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाली आहे. त्यांना येत्या 9 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली येथे मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात येणार आहे.
वाळुज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे सहायक महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले व्यंकट मैलापुरे यांना ही पदवी जाहीर झाल्याने उद्योगपती व मराठी चित्रपट निर्माते मनोज कदम, प्रशांत पवार, प्रो. डॉ. भरतसिंग सलामपुरे, आय जी जाधव, हनुमान भोंडवे, दिगंबर चापटे, मदन दराडे, प्रो. डॉ. बी. जी गायकवाड, एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, गिरीधर गायकवाड, अमर बोराटे, संजय चोबे, संदीप इनामके, डॉ. पंकज बलदोटा, डॉ. जैनेंद्र छल्लानी, डॉ. पवन शर्मा, संतोष कोटकर, रमेश बिरादार आदी मान्यवरांनी मैलापुरे यांचे स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *