
वाळुज महानगर, (ता. 5) – बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त निमित्त 2 व 3 मे रोजी पासिंग व्हॉलीबॉल पुरुष खुला गट या स्पर्धेचे आयोजन बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिर या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धा पुरुष खुल्या गटात घेण्यात आल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक हनुमान भोंडवे, कैलास भोकरे, कडूबा चोपडे, ज्योती चोपडे, सामाजिक कार्यकर्ते उमेश दुधाट, श्री गजानन विद्या मंदिरचे आय. जी. जाधव, इप्का कंपनीचे व्यंकट महिलापुरे, बालाजी शिंदे, बाळू खराडे, दत्ता आघाव, सौरभ चित्रक यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी वाळूज पंचक्रोशीतील विविध वेगवेगळ्या संघाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पंच म्हणुन प्रा.नारायण शिंदे, चंद्रशेखर जाधव, शेख शफी, प्रफुल कुलकर्णी यांनी कामगिरी बजावली.

बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. कैलास जाधव, उपाध्यक्ष अण्णा चव्हाण, सचिव शेख शफी, कोषाध्यक्ष सी. के. जाधव, रामेश्वर वैद्य, कार्याध्यक्ष समाधान हराळ, बीएसएफचे मार्गदर्शक दत्ता पवार, संचालक अमोल मुंगीकर यांच्यासह बीएसएफच्या सर्व संचालक मंडळ व क्रीडा शिक्षक यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले आहे. सूत्रसंचालन दत्ता पवार यांनी केले तर आभार चंद्रशेखर जाधव यांनी मानले.
