वाळूजमहानगर – महाराष्ट्र ग्रामीण वाळूज शाखेतर्फ एकलहेरा गावात “सक्षमीकरणासाठी आर्थिक समावेशन” या 15 आक्टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत सूरु राहणार्या मोहिमे अंतर्गंतचा कार्यक्रम रविवारी (ता.16) झाला.यावेळी शाखा व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी यामोहीमअंतर्गंत येणार्या जनधन बचत खाते योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अटल पेंशन योजना, किसान क्रेडीट कार्ड योजना, कृषी पायाभूत विकासनिधी योजना, प्रधानमंत्री वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया ऊद्योग योजना, शेतकरी ऊत्पादक कंपनी योजना अशा विविध योजनांची माहिती महिला व नागरिकांना दिली.
सदर विविध योजनांमध्ये सहभाग घेऊन सर्व बचत खातेदारांनी आर्थिक समावेशनाद्वारे होणार्या विकास प्रक्रियेमध्ये डिजीटल पध्दतीने सहभागी व्हावे व संपूर्ण आर्थिक समावेशनासाठी होत असलेल्या विविध प्रयत्नांना सहकार्य करून आपले व कुटुंबाचे सक्षमीकरण करावे. असे आवाहन यावेळी नितीन टेकाडे यांनी खातेदारांना व कर्जदारांना केले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे राबविण्यात येणार्या महिला बचत गट, रूपे डेबिट कार्ड व आरोग्य विमा योजनेचीही माहिती खातेदारांना देऊन त्याचे महत्व पटवून दिले व अनियमित निसर्ग व हवामान या पार्श्वभूमीवर आरोग्य विम्याचे महत्व सर्व शेतकरी बधू भगिनींना पटवून अधोरेखित केले व आपण सतत विमा संरक्षित राहण्याचे आवाहन केले. यावेळी शाखेचे अधिकारी कल्पना रावले यांनीही सर्व योजनांबाबत ऊपस्थितांना मार्गदर्शन केले. व सहभाग नोंदवण्याची विनंती केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण गांगर्डे , संजय राऊत यांनी विशेष सहकार्य केले.