February 23, 2025

वाळुज महानगर, (ता.3) – लोकसभा निवडणुकित महाराष्ट्रातील 48 जागांचा “रिंगसाईड रिसर्च “चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार महायुतीला जोरदार धक्का बसताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळत असल्याचे समोर येत आहे. मविआला 29, महायुतीला 18 तर अपक्षाला 1 जागेवर यश मिळेल असा रिंगसाईड रिसर्च चा अंदाज आहे. देशाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे महाराष्ट्रात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचाही फैसला जनतेच्या न्यायालयात होईल असं सांगितलं जात होतं. त्यामुळे महाराष्ट्राचे एक्झिट पोल चे आकडे नेमके काय दर्शवतात याची उत्सुकता होती. ते अखेर समोर आले आहे. त्यात “रिंगसाईड रिसर्च ” च्या एक्झिट पोल मध्ये महायुतीची जोरदार पीछेहाट होताना दिसते आहे. विशेष म्हणजे अनेक मोठमोठ्या नेत्यांना यात पराभवाचा सामना करावा लागू शकतो असेही चित्र आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा रिंगसाईड रिसर्च चा सर्वे आहे.

मराठवाड्यातील सर्वात चर्चेत असलेली जागा म्हणजे औरंगाबाद लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे शिवसेना उबाठा पक्षाचे चंद्रकांत खैरे विजयी होतील. बीड लोकसभा पंकजा मुंडे बाजी मारतील तर जालना मध्ये मात्र रावसाहेब दानवे यांचा पराभव होऊ शकतो. असे रिंगसाईड रिसर्च चा पोल सांगतो. असे रिंगसाईड रिसर्च च्या एक्झिट पोल मधून समोर येते आहे.
सर्वात जास्त चर्चेत असलेली जागा म्हणजे बारामती लोकसभा. इथे कुठल्या पवारांच्या बाजूने निकाल लागेल याच्या चर्चा झडत होत्या. अखेर यात शरद पवारांच्या बाजूने निकाल लागेल अर्थात सुप्रिया सुळे विजयी होतील असे रिंगसाईड रिसर्च च्या एक्झिट पोल मधून समोर येते आहे. तर शिरूरमधून अमोल कोल्हेच पुन्हा बाजी मारतील आणि आणखी चर्चेत असलेली जागा म्हणजे माढा. माढयातही भाजपमधून निवडणुकीआधी राष्ट्रवादी मध्ये आलेले धैर्यशील मोहिते बाजी मारतील असा रिंगसाईड रिसर्च चा अंदाज आहे. विदर्भातील चर्चेची जागा म्हणजे चंद्रपूरची जागा. यात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही पराभवाचा धक्का बसू शकतो असे रिंगसाईड रिसर्च चा पोल सांगतो.

कोण होणार कुठून विजयी –

रामटेक – शिवसेना एकनाथ शिंदे
नागपूर – भाजप
गडचिरोली – काँग्रेस
चंद्रपूर – काँग्रेस
भंडारा गोंदिया – काँग्रेस
अकोला – भाजप
अमरावती – भाजप
वर्धा – राष्ट्रवादी शरद पवार
बुलढाणा – शिवसेना एकनाथ शिंदे
यवतमाळ – शिवसेना उबाठा
नांदेड – काँग्रेस
हिंगोली – शिवसेना उबाठा
परभणी – शिवसेना उबाठा
बीड – भाजप
उस्मानाबाद – शिवसेना उबाठा
जालना – काँग्रेस
लातूर -काँग्रेस
औरंगाबाद – शिवसेना उबाठा
जळगाव – भाजप
रावेर – भाजप
धुळे – काँग्रेस
नंदुरबार – काँग्रेस
दिंडोरी – राष्ट्रवादी शरद पवार
नाशिक – शिवसेना उबाठा
अहमदनगर – राष्ट्रवादी शरद पवार
शिर्डी – शिवसेना उबाठा
पालघर – भाजप
कल्याण – शिवसेना एकनाथ शिंदें
ठाणे – शिवसेना एकनाथ शिंदे
भिवंडी – राष्ट्रवादी शरद पवार
मुंबई उत्तर पुर्व – भाजप
मुंबई उत्तर – भाजप
मुंबई उत्तर मध्य – काँग्रेस
मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना उबाठा
मुंबई दक्षिण – शिवसेना उबाठा
मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना एकनाथ शिंदे
रत्नागिरी- सिंधुदुर्ग – शिवसेना उबाठा
रायगड – राष्ट्रवादी अजित पवार
सोलापूर – भाजप
कोल्हापूर – काँग्रेस
माढा – राष्ट्रवादी शरद पवार
सातारा – राष्ट्रवादी शरद पवार
हातकणंगले – शिवसेना उबाठा
सांगली – अपक्ष विशाल पाटील
शिरूर – राष्ट्रवादी शरद पवार
बारामती – राष्ट्रवादी शरद पवार
पुणे – भाजप
मावळ – शिवसेना एकनाथ शिंदे

(टीप ही बातमी “रिंगसाईड रिसर्च” या जनमत चाचणी करणाऱ्या संस्थेच्या अंदाजावर आधारीत आहे. निकाल मतमोजणीनंतर 4 जूनला कळेल)

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *