
वाळूजमहानगर, (ता.13) – महापुरुषांचा आदर सर्वांनी केलाच पाहिजे, ज्यांना करायचा नसेल त्यांनी हैदराबादला जावे. असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता लगावला. छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, महात्मा फुले किंवा अण्णाभाऊ साठे असो. या पुतळ्यासाठी मी प्रयत्नशील आहे. ज्या ज्या महापुरुषांमुळे आपण आहोत त्यांची आठवण नेहमी असली पाहिजे. ही या मागची भूमिका आहे. जातीचे राजकारण आम्ही करत नाही. येत्या काही महिन्यात आजी आजोबांसाठी गार्डन, चांगला पुतळा तसेच भव्य शिवस्मारक हे सर्व कामे येत्या काही महिन्यात पूर्ण झालेली असेल. असे आश्वासन आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी (ता.12) रोजी वडगाव (को.)-बजाजनगर येथे नागरिकांना दिले.
छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधील वडगाव (को.)- बजाजनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याचे अनावरण आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी (ता.12) रोजी सायंकाळी 7 वाजता केले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, जय जय जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर जणांना होता.
तत्पूर्वी आमदार संजय शिरसाट यांनी बजाजनगर, वडगाव (को.) येथे केलेल्या विकास किमाची पावती देत यांनी वडगाव हे पूर्वी कसे होते, येथील लोक कसे होते. येथे झालेल्या विकासामुळे ते कसे बदलले. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून आज वडगाव येथील जनता माझ्याबरोबर काम करीत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
व्यासपीठावर जिल्हा प्रमुख, राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट, हनुमान भोंडवे, सरपंच सुनील काळे, उपसरपंच ज्योती साळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे,
पंचायत समिती सदस्य राजेश साळे, सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य माधुरी सोमासे, मंदा भोकरे, उद्योजक कैलास भोकरे, पोपट हांडे, किसन पाटोळे, विलास पठारे आदींसह ग्रामपंचायतचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुतळा बसवण्याचे भाग्य मिळाले हीच खरी कमाई –
वडगाव (को.) येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा बसवला. हा पुतळा बसवण्याचे जे मला भाग्य लाभले. हीच खऱ्या अर्थाने माझी कमाई आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या नावासाठी लवकरच सह्यांची मोहीम राबवली जाणार असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. आणि आपल्या घरावर प्रत्येकाने भगवा झेंडा लावावा. असे आवाहन ही आमदार संजय शिरसाठ यांनी केले.
