वाळूजमहानगर (ता.29) :- लहुजी सैनिक संघ आणि लहु प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी (ता.28) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार व लहुजी सैनिक संघाचे संस्थापक अध्यक्ष रतन शेलार यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. लहू प्रहार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष नितीन आव्हाड, मराठवाडा अध्यक्ष आनंद लोखंडे, आंबेडकरवादी पॅंथर संघटनेचे शहराध्यक्ष राहुल भालेराव, लहुजी सैनिक संघाचे शहर कार्याध्यक्ष परसराम रनसिंग, जिल्हाध्यक्ष राजेश वाघमारे, वाळूज महानगर अध्यक्ष पांडुरंग जाधव, विशाल खंडागळे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.