February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.24)- वाळूज येथील झेंडा मैदानावर 14 डिसेंबरपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता गुरूवारी (ता.21) रोजी मठाधिपती महंत गुरूवर्य रामगिरी महाराज, सरला बेट यांच्या काल्याचे हरिकिर्तन होऊन झाली.

ह भ प विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली 14 डिसेंबर पासून झेंडा मैदानावर या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी परिसरात टाकण्यात आलेल्या भव्य मंडपात सप्ताहाच्या प्रारंभी नारायण नंदगिरी महाराज यांचे रात्री आठला कीर्तन झाले. त्यानंतर शिवानंद महाराज शास्त्री, तुकाराम महाराज मुंडे, संजय महाराज घोडके, गोविंद महाराज गोरे, विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे, संगीता व्यवहारे यांचे कीर्तन झाले. या सप्ताहाच्या सांगते प्रसंगी गुरुवारी (ता.21) रोजी सकाळी साडेआठला गावातून टाळ-मृदंगाच्या वाद्यात मिरवणूक काढण्यात आली. यात अनेकांनी सहभागी होत मोठया उत्साहात पावली व फुगडी खेळत आनंद लुटला. त्यानंतर काल्याचे किर्तनझाले. यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी विश्वास जनिता, म्हणे यशोदेशी माता या अभंगवाणीवर समाजप्रबोधन केले. या सप्ताह दरम्यान भाविकांची मोठी उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *