
वाळूज महानगर, (ता.31) – मसिआ आणि जीआयझेड यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ड स्केल डे चे औचित्य साधून सभासद कंपन्या मधील स्किल्ड कर्मचाऱ्यांचा सन्मान सोमवारी (ता.31) रोजी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शिवप्रसाद जाजू यांच्यासह मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील, मसिआ स्किल डेवलपमेंट सेंटरचे कनव्हेनर अर्जुन गायकवाड, जी आय झेड चे टेक्निकल अॅडव्हायजर रवीशंकर कोरगल, शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संजय गौरशेट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्य बळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी मसिआ सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून मसिआच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत जीआयझेड व आयटीआयच्या सहकार्याने ड्युअल सिस्टम ट्रेनिंग या योजनेअंतर्गत मसिआ सभासद असेलेल्या विजय गियर्स, श्री गणेश इंजिनिअरिंग, मनीष इंजिनिअरिंग वर्क्स, चंद्रा इलेक्ट्रिकल या इलेक्ट्रॉनिक्स, शुभनील इंडस्ट्रीज, प्रणील इंडस्ट्रीज, गिरनार गियर्स, जिजाई इंडस्ट्रीज, कोअरटेक औरंगाबाद आदि कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्रेडच्या संबंधित कामाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले आहे. 
या प्रशिक्षणाअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या अशोक घाडगे, जयदेव महातो, किशोर महातो, कृष्णा चव्हाण, मंदाताई पगारे, मारोती गुळवकर, मिलिंद पनगळ, प्रकाश ठाकरे, सागर खर्चे, संदीप राजपूत, संतोषी डोमे आणि मतीन खान अशा 12 कर्मचाऱ्यांचा वर्ड स्किल डे चे औचित्य साधून शनिवारी (ता.31) रोजी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मसिआचे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, सचिव कमलाकर पाटील, कोषाध्यक्ष राजेश मानधनी, सहप्रसिद्धी प्रमुख श्रीराम शिंदे, कार्यकारिणी सदस्य अभिषेक मोदाणी, प्रल्हाद गायकवाड, सलिल पेंडसे, शरद चोपडे, संजय कुलकर्णी, राजेश हुंडेकर, मंगेश निटुरकर यांची उपस्थिती होती.
