February 5, 2026


वाळूजमहानगर (ता.9) – मसिआच्या वाळूज येथील कार्यालयात तैवान चेंबर ऑफ कॉमर्स, मुंबईचे जेनीफर मकेचा, सिएनएफआयचे कार्यकारी प्रमुख मेलन आणि त्यांचे सहकारी तसेच औरंगाबाद मेटल फिनिशर असोसिएशनचे अध्यक्ष दर्शन सोमाणी, मसिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील व भगवान राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मसिआ औरंगाबाद मेटल फिनिशर असोसिएशन आणि तैवान (सिएनएफआय) यांच्यात मंगळवारी (ता.8) रोजी बैठक झाली. यात उद्योग-व्यापार वाढ व आँरिकमध्ये गुंतवणुकीसाठी प्रयत्न होणार असल्याचे संकेत आहे.

यावेळी उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी मसिआ आणि मसिआच्या जानेवारी 23 मध्ये होणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनाविषयी माहिती दिली. तसेच औरंगाबाद आणि तैवान येथील उद्योगात आयातनिर्यात वाढावी, बीटुबीच्या माध्यमातून व्यवसायाच्या नविन संधी निर्माण व्हायला हव्या, अद्ययावत तंत्रज्ञानात वाढीसाठी औद्योगिक भेटी वाढवणे, औद्योगिक प्रदर्शन आणि सहभाग तसेच औरंगाबाद येथील आँरिक मध्ये तैवानच्या उद्योजकांनी गुंतवणुक करावी यासाठी प्रयत्न असे मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी मसिआ ऑटोमोबाईलसह सर्व क्षेत्रात चांगल्या प्रकारे उत्पादन घेत असून उत्पादित माल एक्सपोर्ट देखील करत आहेत. तसेच व्यवसाय वाढीसाठी मसिआ संघटना त्यांच्या सभासदांना नेहमीच प्रोत्साहन देते. असे उपाध्यक्ष भगवान राऊत यांनी सांगितले. यावेळी दर्शन सोमणी आणि संजय कुलकर्णी यांनी ए एम एफ ए संघटनेबद्दल माहिती दिली. जेनीफर मकेचा यांनी तैवान येथील औद्योगिक क्षेत्राबद्दल माहिती दिली. यावेळी तैवान सोबत व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सी एन एफ आय मदत करण्याचे आश्वासन देत मेलन यांनी ऑरिक सिटी मध्येही गुंतवणूक करण्याची तयारी देखील दर्शवली. यावेळी अभिषेक मोदाणी, प्रल्हाद गायकवाड, दुष्यंत आठवले, सर्जेराव साळुंके, अर्जुन गायकवाड, गजानन देशमुख, आनंद पाटील, दिलीप चौधरी, अंगिरस जोशी, गोपाल अग्रवाल, महेश शिंदे यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *