February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.4) – खिडकीत उभे राहून मला बाहेर काढा. अशी आर्त हाक खोलीत डांबून ठेवलेल्या वृद्ध महिलेने दिली. ती कानावर येताच या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना गुरुवारी (ता.5) रोजी उघडकीस आली. दरम्यान या महिलेची सुटका करण्यासाठी महिला मंडळांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेत निवेदन दिले.

याबाबत सम्राट अशोक महिला विकास मंडळ, औरंगाबाद पोलीस आयुक्त औरंगाबाद यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, नागेश्वरवाडी येथील रहिवासी असलेल्या एका वयोवृध्द महिलेला घरामध्ये कोंडून ठेवण्यात आलेले आहे. या परिसरामध्ये विचारपूस केली असता तेथील नागरीकांनी सांगीतले कि, मागील दोन वर्षापासून या महिलेला घरामध्ये कोंडून ठेवण्यात आलेले आहे. व त्या महिलेचे खिडकीमधून व्हिडीयो क्लिप काढण्यात आलेली आहे. त्या व्हिडीयोमध्ये ती बाहेर काढा असं म्हणत आहे. या वयोवृध्द महिलेला बाहेर काढण्यात यावे. व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

   खरा प्रकार काय

याबाबत अशीही माहिती मिळते की, ही वृद्ध महिला एकटीच खोलीत डांबून ठेवलेली आहे. ती रहात असलेल्या खोलीतून किळसवाणी दुर्गंधी येत आहे, शिवाय स्वच्छता नाही. विशेष म्हणजे या महिलेला घरचे जेवण देण्याऐवजी बाहेरचे जेवण देण्यात येते. ती नेहमी खिडकीतून ओरडत असते. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहे. तसेच

या महिलेला डांबून ठेवलेले नसून, महिला वयोवृद्ध आहे. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्या महिलेसाठी केअर टेकर सुद्धा ठेवलेली आहे. असेही माहिती मिळते. मात्र याबाबत सखोल चौकशी झाल्यानंतरच खरा प्रकार काय, तो समोर येणार आहे.

घटनास्थळी पोलिसांची धाव
यानंतर क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत या वृद्ध महिलेला कोणी व कशासाठी डांबून ठेवले. ती आजारी आहे की, मानसिक रित्या वेडी आहे. ते समोर येणार आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *