March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9)- वडगाव रामपुरी येथे शासकीय गायराण जमीनीवर अतिक्रमण करून अवैधरित्या मरूम उत्खनन करणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक रामलाल भगुरे यांने वडगाव (रामुपरी) गट क्र 88 सरकारी गायराण जमीनीवर अतिक्रमण केले. तसेच या जमीनीतून 55 फुट रूंदीचा खड्डा करून त्यातुन अंदाजे 1 हजार 691 ब्रास मरुमाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुक करून चोरी केली. या प्रकरणी तलाठी अरूणा बनोसोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक भगुरे यांच्या विरूध्द वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. दिपक रोठे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *