वाळूज महानगर (ता.30) :- मराठा समाजास आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली येथे उपोषणास बसले आहे. दिवसेंदिवस त्यांची प्रकुर्ती खालावत असल्याने उपोषणकर्ते आक्रमक झाले आहे. जरांगे यांच्या समर्थनार्थ रविवारी (ता.29)रोजी सजापूर गट नंबर मधील क्रांतीनगरमध्ये येथे सकल मराठा समाजाकडून साकळी उपोषण सुरू केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने पुढील आंदोलनाची दिशा ठरल्यास साखळी आंदोलनाचे रूपांतर हे आमरण उपोषणात होईल. सत्ताधाऱ्यांनी आता मराठ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा भयंकर परिणाम होतील. असेही आंदोलनकर्ते म्हणाले. याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा, लाख मराठा. अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आदिनाथ भुमे, हरिभाऊ बुरंगे, बाबासाहेब जाधव, दादासाहेब गाडगुळ, समाधान जगताप, रामप्राद शिंदे, रामेश्वर भागस, ऐश्वर्या भुमे, सत्यशीला बुरंगे, वर्षा कवरखे, स्वाती तायडे, उज्वला पाटील हे उपस्थित होते.