
वाळूजमहानगर, (ता.1) – बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी शाळेत मराठी गौरव दिवस व राष्ट्रीय विज्ञान दिवस सी वी रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंगळवारी (ता.28) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची सी वी रमन आणि मराठी गौरव दिनावर आधारित भाषणे, गायन झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कॉइन बँक, एटीएम, एअर कुलर, सोलार एनर्जी, वॉटर डिस्पर्सल असे विविध प्रकारचे प्रयोग तयार केले होते. संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, गजानन प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे तसेच संस्थेचे सचिव हरीश जाधव, बी व्ही शिरसाठ,
रेखा बिदरकर तसेच लता वैष्णव, ममता खोतकर, पूजा खोतकर, पूजा ठाकूर, बिंदु प्रजापती, धनंजय जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ बिंदू प्रजापती आणि नियोजन सौ रेखा बिदरकर यांनी केले .
