March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.23) – ब्रह्मकमळ साहित्य समूह मुंबई, समग्र प्रकाशन तुळजापूर आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने येत्या 28 मे रोजी मराठी गजल कार्यशाळा व मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी भवन या ठिकाणी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणाऱ्या या कार्यशाळेत डॉ. इक्बाल मिन्ने, वैभव कुलकर्णी आणि दास पाटील यांचे गजल तंत्र, मंत्र व आशय आदींवर मार्गदर्शन होईल. सोबतच दुपारी 4 वाजता गजलकारांचा मुशायरा होईल. या कार्यशाळेकरिता नोंदणी-मूल्य अनिवार्य आहे. नोंदणी केलेल्यांकरिता भोजनाची व्यवस्था आयोजन समितीद्वारे केली जाईल. गज मुशायऱ्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असेल. कार्यक्रमाचे उद्घाटन रे. भ. भारस्वाडकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत सहभाग घेण्याचे आवाहन आयोजन समितीतील सदस्य अंजली दीक्षित, राजू राठोड व संदीप मर्ढेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *