वाळूज महानगर, (ता.26) – दिलेला शब्द सरकारने न पाळल्यामुळे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा आरक्षणासाठी वाळुज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास गुरुवारी (ता.26) रोजी सुरुवात करण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण केले. दरम्यान सरकारने मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. चाळीस दिवस उलटूनही सरकारने शब्द पाळला नाही.
त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. या उपोषणाला पाठिंबा म्हणून वाळूज येथे सकल मराठा समाजाचे वतीने साखळी उपोषण गुरुवारी (ता.26) रोजी पासून सुरू केले. वाळुज, लिंबे जळगाव पिंपरखेडा, लांझी, मेहंदीपूर नायगाव, बकवालनगर, शिवाजीनगर येथील नागरिक या उपोषणात सहभागी झाले आहेत.