April 13, 2026


वाळूज महानगर, (ता.13) – वाळूज येथील आयसीम इंजिनिअरिंग, पाॅलिटेक्नीक व एमबीए कॉलेजमध्ये मराठवाड्यातील पहील्या ‘अप्लाइड ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी एक्सलन्स सेंटरचे ‘उद्घाटन करण्यात आले तसेच ‘ब्लॉकचेन व हेडेरा’ प्रमाणपत्रावरील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा तीन दिवसीय विकास कार्यक्रम उत्साहात पार पडला.

याप्रसंगी ‘आयडीएस’ चे विभागीय समन्वयक संजय गुंजकर, आयडीएसचे उपाध्यक्ष अमित चंद्रा, तंत्रज्ञानाचे मार्गदर्शक निकिता कोटमे, आयसीएमचे सचिव डॉ. सचिन झवर व निकिता गुगळे यांची उपस्थिती होती.

वित्त, आरोग्यसेवा, पुरवठा साखळी आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे डेटा सुरक्षितता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढत असल्याचे मत आयसीमचे संचालक डॉ. रत्नदीप देशमुख यांनी व्यक्त केले. संस्थेने स्थापन केलेले हे उत्कृष्टता केंद्र संशोधन, नवनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योग-सहकार्य यांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचा यामागील उद्देश असल्याचे आयसीमचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर चंद्रप्रकाश पद्मावत म्हणाले. याचबरोबर आयोजित करण्यात आलेला प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) शिक्षकांच्या तांत्रिक क्षमतेत भर घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमाद्वारे प्राध्यापकांना ब्लॉकचेनच्या अत्याधुनिक संकल्पना, संशोधन आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोग याबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. विशेषतः हेडेरा प्रमाणपत्रामुळे सहभागीांना अत्याधुनिक वितरित लेजर तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे अशी माहिती उपप्राचार्य हेमंत जाधव यांनी दिली.

या उपक्रमातून आयसीईईएम इंजिनिअरिंग कॉलेजची शैक्षणिक उत्कृष्टता, उद्योगाशी सुसंगतता आणि सतत शिक्षणाची बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे मत आयसीमचे सचिव डॉ. सचिन झवर यांनी व्यक्त केले. तसेच, हा उपक्रम शिक्षणतज्ज्ञ आणि व्यावसायिक यांच्यात ज्ञान-विनिमय, सहकार्य आणि कौशल्य विकासासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल असा विश्वास अध्यक्ष डॉ. सुभाष झवर आणि उपाध्यक्ष दिलीप सारडा यांनी व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नितीन मगर, डॉ सय्यद अख्तर, प्रा. सविता गावंडे, प्रा. स्वप्निल ताठे, प्रा. किरण चव्हाण, प्रा. युवराज पवार आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *