March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.14) – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे मराठवाड्यातील जीप्याट (GPAT) उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी मराठवाड्यातील 100 हुन अधिक जीप्याट उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

या कार्यक्रमास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. संजय तोष्णीवाल, शासकीस औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.राजेंद्र मराठे व सी.एस.एम.एस.एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT) ही एम. फार्मा प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतली जाते. या वर्षी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी या परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्यामुळे इंडियन फार्मसुटिकल अससोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या सहयोगाने श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित कारण्यात आले. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ .संतोष शेळके, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *