February 21, 2025

वाळूजमहानगर, (ता.15) – बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख उच्च महाविद्यालयांमध्ये 44 वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (ता. 25) रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने मोठ्या उत्साहात झाले.

यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील, 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जगदीश कदम, संमेलनाअध्यक्ष डॉ.भीमराव वाघचौरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा.दादा गोरे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष विजय राऊत, शाहू पाटोळे, डॉ.आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके, रामचंद्र साळुंखे, डॉ.गणेश मोहिते, डॉ.दीपा क्षीरसागर, विलास राऊत, विवेक जैस्वाल, प्राचार्य डॉ.राहुल हजारे, उपप्राचार्य संजय सांभाळकर, प्रा.युवराज धबडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 दर्जा मिळाला म्हणून भाषेचा विकास होत नाही – कौतिकराव ढाले पाटील –
केंद्र सरकारने मराठी भाषाला अभिजीत भाषेचा दर्जा दिला म्हणून सरकार गाजावाजा करत आहे. मात्र सरकारमधील किती लोकांना अभिजीत भाषा म्हणजे काय याची माहिती आहे. हा मोठा प्रश्न आहे. अभिजीत भाषेचा दर्जा मिळाला म्हणून भाषेचा विकास होत नाही. याकरिता शासनाला मनापासून मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु तसे करताना हे सरकार दिसत नाही. कारण राज्यातील मराठी भाषेच्या शाळेची अवस्था पाहता या सरकारला मराठी शाळा बंद करायचे आहे. कारण याकरिता अनुदान द्यावे लागते. मराठी शाळा जर बंद पडल्या. तर मराठी भाषेचा विकास कसा होईल. अभिजीत भाषा दर्जा मिळाला म्हणून केंद्र सरकारतर्फे तीनशे कोटी रुपयांचा निधी भाषा विकासासाठी मिळेल. या भ्रममध्ये राज्य सरकार आहे. मात्र आतापर्यंत केंद्र सरकारने ज्या भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा दिला. त्या भाषांना किती निधी दिला याचा विचार करता केंद्राकडून फार अपेक्षा नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने आपल्या माय मराठीसाठी भरघोस निधी देणे गरजेचे आहे. परंतु ज्यांच्याकडे मला मागणी करायची होती. ते भाषा विषयाचे मंत्री वेळ देऊनसुद्धा आज संमेलनाला गैरहजर राहिले. हे यांचे भाषाविषय प्रेम. सातोला कौतिकराव ठाले यांनी लगावला.
मराठवाड्याचे साहित्य हेच महाराष्ट्राचा इतिहास आहे. मात्र मराठवाड्यातील राजकारणी स्वार्थी झाल्यामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. मराठवाड्याच्या साहित्याला एक हजार वर्षांपूर्वीची परंपरा आहे. त्यामुळे मराठवाड्यात मराठी विद्यापीठ होणे गरजेचे असताना विदर्भामध्ये मराठी विद्यापीठ होते. आणि मराठवाड्याचे राजकारणी स्वार्थासाठी गप्प बसतात. मत्स्य विद्यापीठ कोकण मध्ये व्हायला हवे मात्र तेही विदर्भात होते हे दुर्दैव आहे. असे यावेळी कौतिकराव ढाले म्हणाले.

बंडखोरांच्या तालमीत आम्ही बंडखोर झालो- आमदार संजय शिरसाट –
यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना सामाजिक न्यायमंत्री तथा संजय शिरसाट यांनी ज्येष्ठ साहित्यिक कौतिकराव ढाले पाटील हे आक्रमक आणि बंडखोर विचाराचे साहित्यिक आहे. त्यांच्याबद्दल मला अत्यंत कौतिक व अभिमान आहे. आमचा नेताही असाच बंडखोर सडेतोड विचाराचा आहे. त्यामुळे बंडखोरांच्या तालमीत आम्ही बंडखोर झालो. बाकी राजकारणी लोकांमध्ये मला तोलू नका. मी शब्द पाळणारा आणि माझ्या मतदारांचे काळजी घेणारा आहे. मराठी भाषा टिकवायचे असेल तर आपण मराठीमध्ये संवाद साधला पाहिजे मात्र आपणच इंग्रजी बोलायला लागलो तर अवघड आहे. असे म्हणत आमदार शिरसाट यांनी सिडकोचे चेअरमन असताना बोर्ड मीटिंग मधील विषय पत्रिका इंग्लिशमध्ये छापून येत होती. मात्र मी ती मराठीमध्ये छापण्यास सुरुवात केली. मराठी भाषा विकासासाठी जे जे करता येईल तिथे सर्व मदत शासन करेल. असे आश्वासन यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

कौतिकराव ढाले पाटील यांनी केली तुतारी बंद
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांचे भाषण सुरू असताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत तुतारी वाजवून करण्यात येत होते. मात्र आमदार संजय शिरसाट उशिरा आल्याने कौतिकराव ढाले यांनी तुतारी वाजवणे बंद करण्याचे सांगितले. तसेच ते वेळेवर आले ही त्यांची चूक आहे. असे भाषणातून ठणकावले. त्यांच्या या रोखठोक पाण्याला उपस्थित साहित्यिक व दर्शकांनी टाळ्या वाजवून साथ दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *