March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग तर्फे औरंगाबाद मध्ये अनाथ, निराधार, निराश्रीत व संकटग्रस्त बालकांसाठी ता.25 ते 27 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या चाचा नेहरू बालमहोत्सवात सावली मुलींचे बालगृह, सिडको वाळूज महानगर-1, औरंगाबाद मधील बालीकांनी (मुलींनी) समूह नृत्य व गाण्या मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

राज्य बालहक्क आयोगाच्या सदस्या प्रज्ञा खोसरे व विभागीय उपआयुक्त हर्षा देशमुख यांच्या हस्ते सावली बालगृहास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी हे पारितोषिक सावली बालगृहाचे संचालक श्रीकांत देशमुख, संचालिका संगाती देशमुख व बालगृहातील मुलींनी स्विकारले. याप्रसंगी जिल्हा महिला बालविकास अधिकारी, संजय कदम औरंगाबाद, आर.एन.चिमंद्रे जालना, कैलास तिडके परभणी, प्रसाद मिरकले यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. सावली बालगृहास पुढील वाटचालीसाठी बी.एल राठोड, जिल्हा परिविक्षा अधिकारी, औरंगाबाद, अशोक शिंदे, महादेव डोंगरे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी, औरंगाबाद, जयराज नारायणकर यांनी शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *