
वाळूज महानगर, (ता.19) – मानव विकास व पूर्ननिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित, महाराष्ट्र विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाळूज, गॅलेक्सी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, वाळूज व पीपल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने व संस्थेचे अध्यक्ष सुनील वाकेकर, सचिव जयश्री बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्राचार्य प्रशांत मरकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ प्राध्यापिका रत्नमाला कदम, गॅलेक्सी स्कूलच्या मुख्याध्यापिका सलमा शेख या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत गीत प्रा. कीर्ती तरटे यांनी गायले. याप्रसंगी फैजल पठाण (12 वी वाणिज्य) याने भाषण केले. यावेळी चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ऋतुजा ढोमणे (MBBS ला नंबर लागल्याबद्दल), संकेत साबळे व प्रेम पेरे (डी फार्मसी ला नंबर लागल्याबद्दल), अंजली कुंडारे (बी एच एम एस ला नंबर लागल्याबद्दल) त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. रितेश राठोड यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. प्रा. किरण तांबट यांनी मराठवाडा स्वातंत्र्य सेनानीची भूमिका, त्यांचा त्याग याबाबत तरुणांनी आदरभाव बाळगावा याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रशांत मरकड यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रबोधनकार ठाकरे यांचे कार्यकर्तृत्व, आजच्या युवकांकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन प्रा. अंजली पळशीकर यांनी केले, तर आभार प्रा. नितीन खंदारे यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
