March 22, 2026

वाळूज महानगर – पंढरपूर येथील लक्ष्मण भाकचंद हिवाळे या पादचारी इसमाचे दुचाकी अपघातात गंभीर जखमी होऊन नुकतेच निधन झाले. हिवाळे हे कुटुंब प्रमुख असल्याने यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले होते.

दरम्यान ही बाब लक्षात घेऊन रांजणगाव (शेणपुंजी) येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अलीम यांनी मयताची आई तान्हाबाई हिवाळे, पत्नी छाया हिवाळे, दिव्यांग मुलगा रोहित हिवाळे, प्रेम हिवाळे यांची भेट घेऊन त्यांना धीर देत त्यांचे सात्वन केले. तसेच हिवाळे कुटुंबास रोख 5 हजार व किराणा सामानाची किट भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी पप्पू सय्यद यांच्यासह लखन सलामपूरे, रामेश्वर महाराज चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी एकनाथ किर्तीकर यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *