वाळुज महानगर, (ता.27) – मद्यपाश हा असा आजार आहे की, जो पिडीत व्यक्ती असतो त्याच व्यक्तीला तो मान्य नसतो आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा, कधीही न बरा होणारा मद्यपाश आजार आहे. मद्यपाश एक जीवघेणा आजार आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. म्हणजे त्यावर जगात औषध अद्यापतरी उपलब्ध नाही. परंतु 100 टक्के उपाय आहे. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कुटुंबात, शेजारी, गावात किंवा आसपास असलेल्या व्यक्ती पर्यंत हा संदेश नक्की पोचवावा. अशी विनंती वर्तमानपत्र विक्रेता विष्णू ढाकणे यांनी केली आहे. मदतीसाठी विनामूल्य ,संपर्क/ हेल्पलाईन 7741041450*

