वाळूज महानगर – मदर तेरेसा इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र मराठी शाळा वाळूज येथे ” मराठवाडा मुक्ती संग्राम” दिन संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष नबी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शनिवारी (ता.17) सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अफसर पटेल होते. यावेळी अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षिका सीमा शेख, वैशाली गाडेकर, रविंद्र उकिरडे, इरफान शेख, आयुब सय्यद, रफिक शेख, योगेश मोर्ये, कनिस शेख, गणेश बनकर, बाळू पालवे, दिनेश पालोदकर, स्वप्निल काकळे, ताजुद्दीन शेख, किशन बारवाल, राहुल शेळके यांची उपस्थिती होती.