March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.7) -पंढरपूर येथील मुख्य रस्त्यावर असणारे मच्छी मार्केट अचानक स्थलांतर करून तिसगाव हद्दीतील सिडकोच्या ग्रीन बेल्टवर बसवण्यात आले. त्यास संतप्त नागरिकांनी मंगळवारी (ता.7) रोजी तीव्र विरोध केल्याने हे स्थलांतर तात्पुरते थांबले. मात्र नागरिकांचा रोष थांबलेला नसून ते पोलीस आयुक्त व सिडकोचे प्रशासक यांची भेट घेणार आहे.

पंढरपूर येथील जामा मस्जिद समोरिल मुख्य रस्त्यावर मच्छी मार्केट भरत होते. मात्र नेहमी होणारे अपघात व वाहतुकीची कोंडी लक्षात घेता वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हे मार्केट अचानक तिसगाव ग्रामपंचायत हद्दीतील उद्योग आयकॉन समोरील सिडकोच्या ग्रीन बेल्ट जागेवर स्थलांतरित केले. सिडको वाळूज महानगर -2 मधील उद्योग आयकॉन, राजपूत पेट्रोल पंपाच्या बाजूला अनाधिकृत मच्छी मार्केट होत असल्याच्या विरोधात नागरिक एकवटले. उच्चभ्रू वस्तीत जवळ असल्याने त्यास नागरिकांनी विरोध करत संतप्त भावना व्यक्त केल्या.

पंढरपूरजवळ असलेल्या तिसगाव हद्दीतील उद्योग आयकॉन, राजपुत पेट्रोल पंप जवळ सिडको ग्रीन बेल्ट सर्विस रोडवर बेकायदेशीर मच्छी मार्केटचे अनाधिकृत दुकान टाकले जात होते. त्याला विरोध करण्यासाठी सम्यक गार्डन सारा विहार येथील रहिवाशांकडून सिडकोच्या वसाहत अधिकारी अस्मिता विरशीद यांना प्रत्यक्ष बोलून नागरिकांनी अतिक्रम हटवण्याची मागणी केली. जर हे अतिक्रमण हटवले नाही, तर परिसरातील नागरिक न्यायालयीन दाद मागणार आहेत. किंबहुना उद्या सिडकोचे प्रशासक यांची भेट घेऊन तात्काळ सिडकोच्या मुख्य रोडवरील अतिक्रम काढण्याची मागणी करणार आहेत.
अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ –
सिडको वाळूजमहानगरच्या मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण होत आहेत. नगर पुणे छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य रस्त्यालगत ग्रीन बेल्ट तसेच सर्विस रोडवर अतिक्रमणाच्या रहिवाशांकडून वारंवार तक्रार देऊन सुद्धा सिडको प्रशासनाने कारवाई आजपर्यंत केलेली नाही. यामुळे मुख्य रस्त्यावर रहदारीस अडचण निर्माण होत आहे. किंबहुना यामुळे सततचे जीवघेणे अपघात सुद्धा होत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *