वाळूजमहानगर, ता.14 – स्वभावाने भोळसर असलेला 35 वर्षीय तरुण वाळुज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथून बेपत्ता झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिल दशरथ राऊत वय 35 रा. झरी ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर हा भोळसर तरुण वाळूज औद्योगिक परिसरात काम धंदा निमित्त आला होता. तो आई, पत्नी व दोन अपत्यासह देवगिरी कॉलनी, रांजणगाव (शेणपुंजी)
येथे राहत होता. स्वभावाने भोळसर असलेला हा तरुण कोणास काही एक न सांगता बेपत्ता झाला. त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी आई कडूबाई राऊत यांनी दिलेल्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचा शोध महिला पोलीस अंमलदार रेखा चांदे घेत आहे.