March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.19) – आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये “विठू माऊलीच्या दारी” हा भक्ती संगीताचा सुरेल कार्यक्रम रविवारी 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून वाळूज महानगरातील भाविक, रसिकांना भक्ती संगीताची ही पर्वणी मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हा भक्ती संगीताचा उपक्रम होणार असून यामध्ये गायक व संगीतकार प्रा. राजेश सरकटे, पार्श्वगायिका अमृता नातू, पायल सरकटे, कुणाल वराळे यांच्यासह 25 कलावंत संत महंतांची विविध अवीट भक्ती गीते गाणार आहे. कला मंडलमचे संचालक दिलीप खंडेराय यांचा संच व संस्कृती महाराष्ट्राचीच्या स्वाती धोकटे यांचा भक्तीसंगीतावर नृत्याविष्कार तसेच नेत्र दीपक दिंडी नृत्य हे या कार्यक्रमाचे आकर्षण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र मगर करणार आहेत. कलावंतांची ही भव्य अशी भक्ती संगीताची कलाकृती असून वाळुजच्या रसिकांना भक्ती संगीताची ही पर्वणी असणार आहे.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वनिमित्त हा विशेष उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाळूज महानगरात होणार आहे. उद्या रविवारी 20 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला इतर मागास, सौर ऊर्जा व दिव्यांग मंत्री अतुल सावे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विठू माऊलीचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे. याप्रसंगी भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोंडवे, तनवाणी शिक्षण समूहाचे अध्यक्ष किशनचंद तनवाणी तसेच वाळूज महागरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भोंडवे पाटील पब्लिक स्कूलच्या प्रांगणात होणाऱ्या या भक्ती संगीताच्या अविट कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य असून वाळूज महानगरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *