
वाळूजमहानगर, (ता.28) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेत आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची पालखी मिरवणूक काढत, विठुरायाच्या नावाचा बुधवारी (ता.28) रोजी जयघोष केला. यावेळी भक्तीमय झालेल्या वातावरणात काही विद्यार्थ्यांनी भजन, नृत्य यांच्या माध्यमातून अध्यात्मिक भक्तीभाव जागृत केला.
याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी तेजस्विनी फटांगरे हिने कीर्तनातून एकादशीचे महत्त्व सांगितले. पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात पालखी मिरवणूक काढत सर्वांना उत्साहित केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, संचालिका मीनाक्षीताई भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, समन्वयक राणी सावंत, गहेना शादिजा, शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते.
